Happy Birthday Sneha Ullal | ऐश्वर्याशी ब्रेकअपनंतर सलमानने तिच्या लूकलाईकला मनोरंजन विश्वात आणलं, जाणून घ्या स्नेहा उल्लालबद्दल…
ऐश्वर्या रायशी ब्रेकअपनंतर सलमान खानने एका अशा अभिनेत्रीला लॉन्च केले, जिचा चेहरा हुबेहून ऐश्वर्या रायसारखाच होता. त्या अभिनेत्रीला पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. सलमानने 2005 मध्ये ‘लकी : नो टाईम फॉर लव्ह’ या चित्रपटाद्वारे या अभिनेत्रीची प्रेक्षकांना ओळख करून दिली.
1 / 5
ऐश्वर्या रायशी ब्रेकअपनंतर सलमान खानने एका अशा अभिनेत्रीला लॉन्च केले, जिचा चेहरा हुबेहून ऐश्वर्या रायसारखाच होता. त्या अभिनेत्रीला पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. सलमानने 2005 मध्ये ‘लकी : नो टाईम फॉर लव्ह’ या चित्रपटाद्वारे या अभिनेत्रीची प्रेक्षकांना ओळख करून दिली. त्या अभिनेत्रीचे नाव होते स्नेहा उल्लाल (Sneha Ullal). जेव्हा, प्रेक्षकांनी स्नेहाला पहिल्यांदा पडद्यावर पाहिलं, तेव्हा एकदा त्यांनाही ती ऐश्वर्या असल्याचं जाणवलं. पण, ऐश्वर्याला मिळालेलं प्रेक्षकांचं प्रेम स्नेहाला मिळालं नाही.
2 / 5
स्नेहा उल्लालचा जन्म 18 डिसेंबर 1987 रोजी झाला. स्नेहाचा ‘लकी : नो टाईम फॉर लव्ह’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही. त्यानंतर तिने ‘आर्यन’ (2006), ‘जाने भी दो यारो’ (2007) आणि ‘क्लिक’ (2009) या चित्रपटांमध्ये काम केले. पहिल्या चित्रपटातून लॉन्च केल्यानंतर सलमानने स्नेहासोबत पुन्हा काम केले नाही.
3 / 5
बॉलिवूडमधून ब्रेक घेतल्यानंतर स्नेहाने तेलुगू चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. तिचा पहिला ‘उल्लासमगा उत्सहमगा’ हा चित्रपट हिट ठरला आणि त्यानंतर स्नेहाला अनेक चित्रपटांच्या ऑफर मिळू लागल्या. मात्र, तिची कारकीर्द चढ-उतारांनी भरलेली होती.
4 / 5
2015 नंतर स्नेहा उल्लाल चित्रपटांमधून अचानक गायब झाली. तिने नंतर एका मुलाखतीत खुलासा केला की, ती तीन वर्षांपासून ऑटोइम्यून डिसऑर्डरने ग्रस्त होती, जो रक्ताशी संबंधित आजार आहे. ती म्हणाली होती की, 'मी इतकी कमकुवत झाली होती की, मी अभिनेत्री म्हणून कामच करू शकत नव्हते. मला तर चालणे, नाचणे आणि सतत शूट करणे खूप कठीण जात होते.’
5 / 5
मात्र, स्नेहा आता पुन्हा चित्रपटांमध्ये परतली आहे. 2020 मध्ये तिची ‘एक्सपायरी डेट’ ही वेब सीरीज रिलीज झाली, ज्यामध्ये तिचे काम पसंत केलं गेलं. तथापि, हे सत्य नाकारता येत नाही की, आजही लोक तिला केवळ ऐश्वर्या रायची लूकलाईक म्हणूनच पाहतात.