आम्ही परस्पर संमंतीने विभक्त होत आहोत... अशी घोषणा हार्दिक - नताशा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली. गेल्या अनेक दिवसांपासून दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला होता.
लग्नाच्या 4 वर्षांनंतर नताशा - हार्दिक यांनी घटस्फोटाची घोषणा केली. घटस्फोटानंतर दोघे एकत्र मिळून मुलाचा सांभाळ करणार आहेत. घटस्फोटानंतर नताशा मुलासोबत मायदेशी देखील परतली आहे.
सर्वत्र हार्दिक - नताशा यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगत असताना एका गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. घटस्फोटानंतर देखील नशाता - हार्दिक यांनी एकमेकांसोबत असलेले फोटो इन्स्टाग्रामवरून काढलेले नाहीत.
मुलगा अगस्त्य याच्यासोबत देखील हार्दिक - नताशा यांचे अनेक फोटो आहेत. नातं संपलं असलं तरी दोघांनी एकमेकांसोबत असलेल्या आठवणी पुसलेल्या नाहीत.
फक्त फोटोच नाहीतर, हार्दिक - नताशा यांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवरू अनफॉलो देखील केलेलं नाही. घटस्फोटानंतर नताशा - हार्दिक यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.