PHOTO : Harry Potter फेम अभिनेत्रीने दिला मुलीला जन्म, सोशल मीडियावर फोटो केले शेअर
प्रसिद्ध हॉलीवुड चित्रपटांची मालिका असणाऱ्या हॅरी पॉटरमधील (Harry Potter) एका अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी मुलीला जन्म दिला. तिने फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
1 / 5
जगातील सर्वात प्रसिद्ध चित्रपट मालिकांपैकी एक मालिका म्हणजे हॅरी पॉटर (Harry potter). 8 चित्रपटांच्या या मालिकेत तुम्ही एका जादूई दुनियेत जाता, ज्याठिकाणी काही चांगले तर काही वाईट जादूगर राहत असतात. त्यात हॅरी त्याच्या मित्रांसोबत कसा वाईट जादूगारांशी सामना करुन त्यांना हरवतो हे सर्व दाखवलं आहे. जगभरात करोडो चाहते असणाऱ्या या चित्रपटांतील एका अभिनेत्रीने नुकताच मुलीला जन्म दिला आहे. या अभिनेत्रीचं नाव अफशान आजाद (Afshan Azad) असं असून तिने चित्रपटात पार्वती पाटील हे पात्र साकारलं आहे.
2 / 5
युकेमधील मँचेस्टरमध्ये राहणारी 32 वर्षीय अफशान आजाद सोशल माडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. ती सतत नवनवीन पोस्ट टाकत विविध फोटो शेअर करत असते. आता मुलीचा जन्म झाल्यानंतर तिने तिचाही फोटो पोस्ट केला आहे. (सौजन्य - Afshan Azad instagram)
3 / 5
अफसानने तिच्या मुलीचा फोटो शेअर केला आहे. मात्र या फोटोत मुलीचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. अनेक सेलेब्रेटी आपल्या लहानग्याचे फोटो लवकर सोशल मीडियावर शेअर करत नाहीत. अफसानने देखील तसेच केले असून बाळाचा चेहरा न दिसणारा फोटो शेअर केला आहे. (सौजन्य - Afshan Azad instagram)
4 / 5
अफसानने काही महिन्यांपूर्वी गरोदरपणातील फोटो पोस्ट केले होते. (सौजन्य - Afshan Azad instagram)
5 / 5
अफसान हीचा विवाह नबील काजी याच्याशी 2018 मध्ये झाला होता. त्यांच्या लग्नाला तीन वर्ष झाली असून नुकताच त्यांनी एका मुलीला जन्म दिला आहे. (सौजन्य - Afshan Azad instagram)