हिना खान म्हटले की, आपल्याला आठवण होते ती म्हणजे ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतील अक्षराची...हिना अक्षराच्या रूपाने प्रत्येक घरापर्यंत पोहचलीये.
हिना खानने टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केलीये. इतकेच नाही तर हिना बिग बाॅसमध्ये देखील सहभागी झाली होती.
आज हिना खानचा वाढदिवस आहे. विशेष म्हणजे हिना 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. गेल्या काही महिन्यांपासून हिना म्युझिक व्हिडिओमध्ये देखील दिसत आहे.
ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेपासून हिनाच्या फॅन फाॅलोइंगमध्ये मोठी वाढ झालीये. हिना कायमच सोशल मीडियावर सक्रिय देखील असते.
हिना खान मुळची जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधील आहे. मात्र, गेल्या कित्येक वर्षांपासून हिना मुंबईमध्येच राहते. काही दिवसांपूर्वी हिनाच्या वडिलांचे निधन झाले