अभिनेत्री रायमा सेन सध्या सोशल मीडियावर हॉट अँड ग्लॅमरस फोटो शेअर करतेय. रायमानं ब्लॅक कलरच्या ड्रेसमधील एका फोटोशूटचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
रायमा सेन अनेकदा आपले बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करते. आता या बोल्ड फोटोंवर चाहते वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या चाहत्यांना तिचा हा अवतार पसंतीस उतरला आहे.
सोशल मीडियावर रायमा सेनची प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. तिचे चाहते तिला बंगाली मोनालिसा म्हणतात. ती 41 वर्षांची झाली आहे मात्र तिची त्वचेवरुन तिच्या वयाचा अंदाज लागत नाही.
रायमा सेनला बर्याचदा सिझलिंग फोटोशूटद्वारे चाहत्यांचे कौतुक मिळते. ती बंगाली चित्रपटांमध्ये जास्त काम करत असली तरी ती हिंदी आणि बंगाली दोनही चित्रपटात सक्रिय आहे.
बॉलिवूड अभिनेत्री मुनमुन सेन यांची मुलगी राइमा सर्व प्रकारचे आउटफिट्स ट्राय करते.
रायमा सेनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती 'द लास्ट अवर' या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे.