मोस्ट स्टाइलिश अवॉर्ड 2023 मध्ये अक्षय कुमार आणि रवीना टंडन हे सोबत दिसले. बऱ्याच वर्षांनंतर अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांना सोबत पाहून चाहते आनंदी झाले. साखरपुडा झाल्यानंतर अचानकच यांचे ब्रेकअप झाल्याने सर्वांना मोठा धक्का बसला होता.
एका जुन्या मुलाखतीमध्ये बोलताना रवीना टंडन हिने अक्षय कुमार याच्यासोबत नाते नेमके का तुटले यावर भाष्य केले. चित्रपट मोहरामध्ये पहिल्यांदा रवीना टंडन आणि अक्षय कुमार हे रोमान्स करताना दिसले होते.
या चित्रपटांपासूनच यांच्या लव्ह स्टोरीला सुरूवात झाली होती. मुलाखतीमध्ये रवीना टंडन हिने सांगितले होते की, हॅप्पी मॅरिड लाईफसाठी तिने अभिनयापासून दूर जाण्याचा देखील निर्णय घेतला होता.
रवीना टंडन हिने म्हटले की, माझा ज्याच्यासोबत साखरपुडा झाला होता, त्याला मी ओळख होते. आम्ही ठरवले होते की, चित्रपटाच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशी लग्न देखील करायचे. मात्र, ते काही गोष्टींमुळे होऊ शकले नाही.
चित्रपटाच्या सेटवर अक्षय कुमार याचे एका व्यक्तीसोबत वाढलेले संबंध बघता रवीना टंडन हिने अक्षय कुमार याच्यासोबतचे नाते तोडण्याचा निर्णय घेतला. यानंतर दोघांना कधीच सोबत बघितले गेले नव्हते.