आयरा खान हिच्या ‘या’ बहिणीला फार कमी लोकं ओळखतात, तिच्या सौंदर्यापुढे प्रसिद्ध अभिनेत्री फिक्या
अभिनेता आमिर खान याची मुलगी आयरा खान हिच्या लग्नाची सध्या सर्वत्र सुरु आहे. आयरा हिचं लग्नं जीम ट्रेनर नुपूर शिखरे याच्यासोबत होत आहे. उदयपूर याठिकाणी शाही थाटात दोघांचा विवाहसोहळा संपन्न होत आहे. दरम्यान, आमिर खान याच्या कुटुंबातील एका मुलीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
1 / 5
आमिर खान याचा चूलत भाऊ आणि सिनेमा निर्माते मंसूर हुसैन खान (Mansoor Hussain Khan) यांची मुलगी झैन मेरी खान आणि आयरा खान बहिणी आणि चांगल्या मैत्रीणी आहेत. आयरा खान हिच्या लग्नात झैन प्रचंड आनंदी दिसत आहे.
2 / 5
आयरा खान अभिनयाच्या जगापासून दूर असेल, झैन हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून झैन हिला स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. झैन हिने आतापर्यंत दोन सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
3 / 5
सांगयाच झालं तर, झैन अद्याप लोकप्रिय अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण करु शकलेली नाही. पण तिच्या सौंदर्यापुढे बॉलिवूडच्या अभिनेत्री देखील फिक्या आहेत. झैन हिने 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मिसेज सीरियल किलर' (Mrs. Seriel Killer) सिनेमातून करियरला सुरुवात केली.
4 / 5
'मिसेज सीरियल किलर' सिनेमात झैन हिच्यासोबत जॅकलीन फर्नांडीज (Jacqueline Fernandez), मनोज बाजपेयी'(Manoj Bajpayee) आणि मोहित रैना (Mohit Raina) यांनी देखील मुख्य भूमिका साकारली होती. झैन हिने 'फील्स लाइक इश्क' या सीरिजमध्ये देखील काम केलं आहे.
5 / 5
सांगायचं झालं तर, आयरा हिच्या लग्नामुळे झैन तुफान चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आयरा हिचं लग्न आणि तिच्या बहिणीच्या सौंदर्याची चर्चा रंगली आहे. झैन सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.