सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या सोशल मीडियावर तिचे नवनवीन फोटो नेहमीच शेअर करत असते.
नुकताच रिंकूने एक फोटोशूट केले आहे. त्या फोटोवर चक्क शाहीद कपूरचा भाऊ इशान खट्टरने रिंकूच्या फोटोंवर कमेंट केली आहे.
इशान खट्टरने कमेंटमध्ये वाइब असं म्हणतं रिंकूच्या फोटोंचे काैतुक केले आहे. रिंकूने देखील हात वर करत इशानच्या कमेंटला रिप्लाय दिला आहे.
रिंकू राजगुरुला सैराट चित्रपटातून प्रचंड फेम मिळालं होतं, सैराटच्या आर्चीवर जगभरातील प्रेक्षकांनी भरपूर प्रेम केलं.
रिंकूचा हा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच पसंतीस आला आहे.
तिचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
रिंकू नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो शेअर करत असते.