प्रेम व्यक्त करणं होणार अजून सोप्पं! नवीन रोमँटिक गाणं ‘येशील तू’ प्रेक्षकांच्या भेटीला!
"बेहोष झाला बेभान वारा, करतो इशारा मोसम नवा, ओली नशा ही ओला किनार, ही आस वेडी माझ्या जिवा "... असे सुंदर शब्द असलेलं 'सप्तसूर म्युझिक'चं नवीन प्रेम गीत 'येशील तू' नुकतेच प्रदर्शित झाले आहे.
1 / 5
"बेहोष झाला बेभान वारा, करतो इशारा मोसम नवा, ओली नशा ही ओला किनार, ही आस वेडी माझ्या जिवा "... असे सुंदर शब्द असलेलं 'सप्तसूर म्युझिक'चं नवीन प्रेम गीत 'येशील तू' नुकतेच प्रदर्शित झाले आहे.
2 / 5
प्रेम आणि प्रेमाने प्रेमावर वाटणारा विश्वास, मनातल्या भावना व्यक्त करणं अलीकडे किती सोप्पं झालंय ना... या वाक्यासाठी हल्लीचच उदाहरण म्हणजे नव्या जोडीचं नवीन रोमँटिक गाणं 'येशील तू'.
3 / 5
अभिनेता सिद्धेश प्रभाकर आणि अभिनेत्री प्रज्ञा या मराठी मनोरंजन सृष्टीतील नव्या कलाकार जोडींच्या माध्यमातून 'येशील तू' गाण्यात प्रेम आणि मनातल्या भावना व्यक्त करण्याची संधी दिली आहे.
4 / 5
सप्तसूर म्युझिक आणि आनंदी इंटरप्राईजेस निर्मित 'येशील तू' हे गाणं आशिष जोशी आणि अबोली गिऱ्हे यांनी गायले आहे, गाण्याचे बोल अंबरीश देशपांडे यांनी लिहिले आहे आणि आदित्य बर्वे यांनी गाण्याला संगीत दिले आहे. अमोल भावे हे गाण्याचे दिग्दर्शक आहेत तर आनंदी भावे यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे.
5 / 5
'येशील तू' हे रोमँटिक गाणं प्रेक्षकांना नक्की आवडेल आणि हे गाणं सप्तसूर म्युझिकच्या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहे.