Jai Bhawani Jai Shivaji : ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेत होणार स्तवन शिंदेची एण्ट्री, साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा जिगरबाज मावळा शिवा काशिद
शिवा काशिद हे स्वराज्याच्या इतिहासातलं महत्त्वाचं पान. शिवरायांचा हा जिगरबाज मावळा हुबेहुब शिवरायांसारखा दिसायचा असं म्हटलं जातं. महाराजांची पन्हाळ गडावरुन सुटका करण्यासाठी शिवा काशिद यांनी छत्रपती शिवरायांचं सोंग घेऊन आपल्या राजाचा जीव वाचवला होता. याच जिगरबाज शिवा काशिद यांच्या शौर्याची गाथा साकारण्यासाठी अभिनेता स्तवन शिंदे सज्ज झाला आहे. (Jai Bhawani Jai Shivaji: Stavan Shinde's entry in 'Jai Bhawani Jai Shivaji' serial)