Janhvi Kapoor | सुंदर-सुंदर वो हसीना बड़ी, सुंदर-सुंदर… जान्हवी कपूरच्या इथेनिक लूकने जिंकलं चाहत्यांचं मन!
बॉलिवूडमध्ये धडक या चित्रपटातून करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अलीकडेच अभिनेत्रीने चाहत्यांसाठी खास फोटो शेअर केले आहेत.
1 / 5
बॉलिवूडमध्ये धडक या चित्रपटातून करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अलीकडेच अभिनेत्रीने चाहत्यांसाठी खास फोटो शेअर केले आहेत.
2 / 5
अभिनेत्री सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना स्वतःशी संबंधित माहिती देत असते. अशा परिस्थितीत अलीकडेच तिने आपल्या नवीन फोटोशूटची झलक चाहत्यांना दाखवली आहे. ज्यामध्ये ती अगदी पारंपारिक लूकमध्ये दिसत आहे.
3 / 5
अबोली रंगाचा जरी वर्क असलेला लेहेंगा तिने या फोटोशूटमध्ये परिधान केला आहे. सोबत हलका ग्लो देणारा मेकअप आणि गोल्डन ज्वेलरीने जान्हवीने आपला हा लूक पूर्ण केला आहे.
4 / 5
जान्हवी कपूरचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत, जे तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसतात. एका इनडोअर सेटअपमध्ये, जान्हवी कपूरने फोटोशूटसाठी किलर पोज दिल्या आहेत.
5 / 5
जान्हवीच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले, तर ती आता ‘गुड लक जेरी’, ‘दोस्ताना 2’ या चित्रपटात दिसणार आहे. अभिनेत्री सध्या सोशल मीडियावर सक्रिय झाली असून, आपल्या चाहत्यांशी सतत कनेक्टेड राहत असते.