बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या मालदीवमध्ये आहे. जान्हवी आपल्या चाहत्यांसाठी मालदीवमधील खास फोटो शेअर करत आहे.
जान्हवी तिच्या एक्स बाॅयफ्रेंडसोबत मालदीवला गेल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच जान्हवीने मालदीवमधून बिकिनीवरील फोटो शेअर केले होते.
नुकताच जान्हवीने तिचे नवे फोटोशूट हे सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोशूटमध्ये जान्हवीचा लूक एकदम जबरदस्त दिसतोय.
जान्हवीने मालदीवमधील बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे जान्हवीचे हे फोटो तिच्या चाहत्यांना देखील आवडले आहेत.
काही दिवसांपूर्वी जान्हवीचा मिली हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, या चित्रपटाला बाॅक्स आॅफिसवर काहीच धमाका करता आला नाही. हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला.