जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रियादेखील कोरोना पॉझिटिव्ह, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती!
कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू वाढत आहे. गतवर्षीप्रमाणे या वर्षाच्या सुरुवातीलाच लोकांना भीती वाटू लागली आहे की, कोरोना पुन्हा प्रभावी होणार नाही ना?. यंदा सर्वसामान्यांसोबतच बडे सेलिब्रिटीही त्याला बळी पडत आहेत. चित्रपटसृष्टीतील अनेक बड्या कलाकारांना कोरोनाचा फटका बसला आहे.
1 / 6
कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू वाढत आहे. गतवर्षीप्रमाणे या वर्षाच्या सुरुवातीलाच लोकांना भीती वाटू लागली आहे की, कोरोना पुन्हा प्रभावी होणार नाही ना?. यंदा सर्वसामान्यांसोबतच बडे सेलिब्रिटीही त्याला बळी पडत आहेत. चित्रपटसृष्टीतील अनेक बड्या कलाकारांना कोरोनाचा फटका बसला आहे.
2 / 6
बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम देखील कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे. त्याने सोमवारी सकाळी ही माहिती शेअर केली आहे की, तो आणि त्याची पत्नी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत.
3 / 6
जॉन अब्राहमने सोमवारी सकाळी त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आणि त्याच्या चाहत्यांना माहिती दिली की, तो कोरोनाच्या विळख्यात अडकला आहे, त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तसेच, त्याची पत्नी देखील कोरोना पॉझिटिव्ह आहे.
4 / 6
त्याने स्टोरीत लिहिले आहे की, तीन दिवसांपूर्वी मी एका व्यक्तीच्या संपर्कात होतो, ज्याला नंतर कळले की त्याला कोरोना झाला आहे. त्यानंतर आता प्रिया आणि मी देखील कोरोना पॉझिटिव्ह झालो आहोत. आम्ही स्वतःला घरी क्वारंटाइन केले आहे, त्यामुळे आता आम्ही कोणाच्या संपर्कात नाही. आम्हा दोघांना लसीकरण करण्यात आले आहे आणि यावेळी आमच्यात सौम्य लक्षणे आहेत कृपया स्वतःची काळजी घ्या आणि निरोगी रहा. मास्क जरूर घाला.
5 / 6
बॉलिवूडमध्ये कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. त्यामुळे चित्रपटसृष्टीतील लोक कामानिमित्त इकडे-तिकडे फिरत असतात. 2 दिवसांपूर्वी जॉनच्या 'बाटला हाऊस' या चित्रपटात त्याची सहकलाकार असलेली मृणाल ठाकूर देखील कोरोना पॉझिटिव्ह आली होती. सोशल मीडियावर माहिती देऊन तिने स्वत:ला क्वारंटाइन केले आहे.
6 / 6
या वर्षी जॉनचे अनेक चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहेत. त्यापैकी एक म्हणजे 'अटॅक' ज्याची रिलीज डेट 28 फेब्रुवारी 2022 ठेवण्यात आली आहे. मात्र, आता त्याचे प्रदर्शनही कोरोनाच्या प्रभावावर अवलंबून असणार आहे.