अभिनेत्री कंगना रनौतच्या लॉकअप शोची सगळीकडे चर्चा आहे. या शोमधील स्पर्धकही तितकेच अतरंगी आहेत. या शोमध्ये सतत चर्चेत असणारी पूनम पांडेदेखील सहभागी झाली आहे.
पूनम पांडे कधी तिच्या कपड्यांमुळे तर कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींमुळेही अनेकदा चर्चेत असते. तिला कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन नावानेही ओळखलं जातं.
पूनमने 2020 मध्ये तिचा बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेसोबत लग्न केलं. पण लग्नानंतर काही दिवसांनीच सॅमवर धमकावल्याचा आणि शोषणाचा आरोप केला. त्यानंतर सॅमला अटक करण्यात आली.
इतकंच नव्हे पॉर्नोग्राफी प्रकरणीही पूनमचं नाव पुढे आलं होतं. मागच्या वर्षी पॉर्नोग्राफी प्रकरणी तिला अटक करण्यात आली होती.
पूनम पांडे तिच्या बोल्ड फोटोंमुळे सतत चर्चेत असते. बोल्ड व्हीडिओ आणि फोटोमुळे ती सोशल मीडियावर ट्रेंडिंग असते.