साईशा शिंदे ही एक कॉस्ट्युम डिझायनर आहे. तिच्या कामाबद्दल सर्वत्र कौतुक होतं.
साईशा शिंदे ही आधी स्वप्नील होती. तिने सर्जरीच्या माध्यमातून आपल्यात बदल घडवून आणला. आता ती मुलगी म्हणून तिला हवं तसं आयुष्य जगते.
तिच्यातल्या या बदला बद्दल साईशा सांगते की, "मी मुलगा म्हणून असताना माझी घुसमट व्हायची आता मुलगी म्हणून जगताना मला खूप चांगलं वाटतं."
साईशा एक उत्तम डिझायनर आहे. हरनाझ संधूने मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला, तेव्हा तिने साईशाने डिझाईन केलेला ड्रेस घातला होता.
साईशा सध्या लॉकअप शोमध्ये आहे. या शोमध्ये तिची जोडी चक्रवाणी महाराजांसोबत आहे.