अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण आता कंगना कोणत्या वादग्रस्त विषयामुळे नाही तर, तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत आली आहे.
कंगना हिने साडीतील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे. साडीत अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
चाहते कंगना हिच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. 'खरंच तू प्रचंड सुंदर दिसते...' अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. अनेकांना कंगना हिला लूक आवडला आहे.
कंगना कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. एवढंचन नाही तर, कायम वादाचा मुकूट आपल्या डोक्यावर मिरवणारी कंगना अनेकदा वादाच्या भोवऱ्यात देखील अडकली आहे.
कंगना सोशल मीडियावर कायम कोणत्या न कोणत्या मुद्द्यावर स्वतःचं मत मांडत असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.