एकेकाळी पैशांची चणचण, आता आहे कोट्यावधी संपत्तीचा मालक, जाणून घ्या कपिल शर्मा याचा प्रवास
कपिल शर्मा हा आपल्या काॅमेडिने सर्वांना पोट धरून हसवतो. गेल्या काही दिवसांपासून कपिल शर्मा हा त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच कपिल शर्मा याचा चित्रपट रिलीज झाला. मात्र, म्हणावा तसा प्रतिसाद हा कपिल शर्मा याच्या चित्रपटाला मिळाला नाही.
1 / 5
काॅमेडियन कपिल शर्मा हा कायमच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच कपिल शर्मा याचा ज्विगाटो हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, म्हणावा तसा प्रतिसाद हा कपिल शर्मा याच्या चित्रपटाला मिळाला नाही. ज्विगाटो चित्रपटासाठी अनेकांनी कपिल शर्मा याच्या अभिनयाचे काैतुक केले.
2 / 5
आज कपिल शर्मा याचा वाढदिवस आहे. अत्यंत कमी कालावधीमध्ये कपिल शर्मा याने त्याच्या शोमधून एक खास ओळख निर्माण केलीये. कपिल शर्मा याच्या शोमध्ये बाॅलिवूडचे अनेक कलाकार हे कायमच हजेरी लावतात. मात्र, एकेकाळी पैशांची चणचण असल्याने कपिल याने फोन बूथवर काम केले.
3 / 5
अत्यंत मेहनतीने कपिल शर्मा याने आपले नाव कमावले आहे. मुंबईतील अंधेरी वेस्ट येथे कपिल शर्मा याचा बंगला असून हा अत्यंत आलिशान आहे. या बंगल्याची किंमत जवळपास 15 कोटीच्या आसपास आहे.
4 / 5
कपिल शर्मा याला अत्यंत महागड्या गाड्यांचा शाैक आहे. लग्झरी गाड्यांचे त्याच्याकडे मोठे कलेक्शन आहे. आज कपिल शर्मा हा कोट्यावधी संपत्तीचा मालक आहे. कपिल शर्मा याची एकून संपत्ती ही 280 कोटी आहे.
5 / 5
विशेष म्हणजे द कपिल शर्मा शोच्या एका भागासाठी कपिल हा तब्बल 50 लाख रूपये फी घेतो. जाहिरातीमधूनही कपिल शर्मा बक्कळ पैसा कमावतो. 2018 मध्ये त्याने गिन्नी चतरथसोबत लग्न केले आणि आता त्याला दोन मुले आहेत.