Karan Johar | करण जोहर याने केली कंगना राणावत हिची बोलती बंद, वाद वाढण्याची शक्यता
कंगना राणावत आणि करण जोहर यांच्यामधील वाद जवळपास सर्वांनाच माहिती आहे. कारण असो किंवा नसो हे दोघेही एकमेकांना कायमच टार्गेट करताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये प्रियांका चोप्रा हिने अत्यंत मोठा खुलासा बाॅलिवूडबद्दल केला होता.
1 / 5
प्रियांका चोप्रा हिने काही दिवसांपूर्वी एक मोठा खुलासा करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. प्रियांका चोप्रा हिने एका मुलाखतीमध्ये बाॅलिवूडमधील काळे सत्य थेट सांगून टाकले. यानंतर अनेक चर्चांना उधाण आले.
2 / 5
प्रियांका चोप्रा हिने एका मुलाखतीमध्ये म्हटले की, कशाप्रकारे तिला बाॅलिवूडमध्ये कोपऱ्यात ढकलले जात होते. इतकेच नाहीतर यादरम्यान तिला चित्रपटामध्ये घेतले जात नव्हते.
3 / 5
प्रियांका चोप्रा हिच्या या खुलाश्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. त्यानंतर अनेकांनी करण जोहर याच्यावर निशाणा साधला. यानंतर सोशल मीडियावर करण जोहर याला मोठ्या प्रमाणात ट्रोलही करण्यात आले.
4 / 5
नुकताच पार पडलेल्या मुकेश अंबानी यांच्या पार्टीमधील प्रियांका चोप्रा आणि करण जोहर यांचा व्हिडीओ पाहून सर्वांना धक्का बसला. कारण या व्हिडीओमध्ये प्रियांका चोप्रा आणि करण जोहर गळाभेट घेताना दिसले. पार्टीनंतर एक पोस्ट शेअर करत ट्रोल करणाऱ्यांवर आणि कंगनावर करण जोहर याने निशाणा साधला.
5 / 5
करण म्हणाला की, इंस्टाग्राम हे टॉक्सिक लवरसारखे आहे... तुमचा पाठलाग करतो, लक्ष वेधून घेतो, तुम्हाला जोडण्याचा प्रयत्न करतो आणि बदल्यात फिटनेस, फॅशन आणि खाद्यपदार्थांवर तुमची मजाक उडवतो. आपण यापासून दूर जाऊ शकता? एवढी हिम्मत आहे का?