Karisma Kapoor हिच्या घायाळ करणाऱ्या अदा; चाहत्यांच्या नजरा हटेना
अभिनेत्री करिष्मा कपूर (Karisma Kapoor) कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे.
1 / 5
‘राजा बाबू’, ‘कुली नंबर १’, ‘साजन चले ससुराल’ आणि ‘जीत’ यांसारख्या अनेक सिनेमांच्या माध्यमातून अभिनेत्री करिश्मा कपूर हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.
2 / 5
करिश्मा कपूर ९० च्या दशकात अभिनय जगतात अव्वल होती. गोविंदा, शाहरुख खान यांसारख्या स्टार्ससोबत देखील तिने स्क्रिन शेअर केली. आज देखील करिश्मा तिच्या सौंदर्यामुळे आणि फिटनेसमुळे चर्चेत असते.
3 / 5
कपूर कुटुंबाची लेक आणि अभिनेत्री करिश्मा कपूर आता बॉलिवूडपासून दूर असली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आज करिश्मा अभिनयात सक्रिय नसली तरी अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या प्रचंड मोठी आहे.
4 / 5
करिश्मा सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. एक काळ होता जेव्हा करिश्मा हिने तिच्या अभिनयाने आणि डान्सने चाहत्यांच्या मनात राज्य केलं.
5 / 5
आज अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यात आनंदी आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा करिष्मा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत होती. करिश्मा आणि संजय यांनी एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केल्यानंतर २०१४ मध्ये दोघे विभक्त झाले.