अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ स्टारर 'टायगर 3' सिनेमाने प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं. चाहत्यांनी देखील सलमान - कतरिना यांच्या जोडीला डोक्यावर घेतलं.
नुकताच झालेल्या मुलाखतीत सलमान खान याच्याबद्दल कतरिना म्हणाली, 'सलमान खान याच्यासोबत सीन शूट करताना, त्याच्यासोबत राहाणं माझ्यासाठी फार खास आहे. मी त्याचा आदर करते...' असं देखील अभिनेत्री म्हणाली. सलमान आणि कतरिना एकमेकांचे चांगले मित्र आहेत.. असं कायम सांगतात.
स्वतःच्या करियरबद्दल देखील अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे. 'पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं तेव्हा मी नवीन होती. पण आता बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी माझं नाव आहे. बॉलिवूडमध्ये मला नवीन ओळख मिळाली आहे.'
कतरिना कैफ कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेत्री कायम पती विकी कौशल याच्यासोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. दोघे कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतात.
अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी लग्न केलं. 9 डिसेंबर 2023 रोजी विकी आणि कतरिना यांनी शाही थाटात लग्न केलं.