Magalsutra | कतरिना कैफ पासून देसी गर्ल प्रियांका पर्यंत, अभिनेत्रींच्या मंगळसूत्रांच्या डिझाईनची चर्चा, किंमत ऐकून बोट तोंडात घालाल
बॉलिवूड कलाकारांची लग्न नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. या लग्नांमधील प्रत्येक गोष्ट चर्चेचा विषय ठरत असते. मग ते पोशाख असो, लूक असो किंवा अॅक्सेसरीज असो. नुकतेच कतरिना कैफचे लग्न झाले. कतरिनाच्या ब्राइडल लूक्सने सर्वांच्याच नजरा वेधून घेतल्या.
1 / 8
कतरिना कैफच्या मंगळसूत्राचे सर्वांनीच खूप कौतुक केले. तिने परिधान केलेल हे मंगळसूत्र सब्यसाचीच्या हेरिटेज ज्वेलरी कलेक्शनमधील डिझायनर मंगळसूत्र आहे. या मंगळसूत्राची किंमत 7.4 लाख रुपये असल्याचे बोलले जात आहे.
2 / 8
देसी गर्ल प्रियंका चोप्राच्या लग्नात सुद्धा तीच्या मंगळसूत्राची चर्चा करण्यात आली होती. सोनेरी पॅटर्नच्या या मंगळसूत्राला लहान काळे मणी जोडलेले होते आणि मध्यभागी एक मोठा हिरा पेंडेंट बनवले होते. या मंगळसूत्राची किंमत कोट्यवधींमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे.
3 / 8
ऐश्वर्या राय तिच्या लग्नाच्या दिवशी खूप सुंदप दिसत होती. लग्नातील ऐश्वर्याचा जबरदस्त लुकची सर्वकडे चर्चा होती. ऐश्वर्याने कांजीवरमच्या साडीवर 75 लाख रुपयांचे मंगळसूत्र घातले होते.
4 / 8
दीपिका पदुकोणच्या लग्न सर्वसाठी खूप खास होते. सातासमुद्रापार इटलीतील लेक कोमो येथे ती विवाहबंधनात अडकली. यावेळी सर्वांच्या नजरा तीच्या मंगळसूत्रकडे होत्या. सूत्रांनुसार या सिंगल सॉलिटेअर मंगळसूत्राची किंमत 20 लाख आहे.
5 / 8
2018 मध्ये अनुष्का शर्माने क्रिकेटर विराट कोहलीसोबत लग्न केले. अनुष्काच्या क्लासी ब्राइडल लूकप्रमाणेच तिचे मंगळसूत्रही ट्रेंडी होते. या हिऱ्याच्या मंगळसूत्राची किंमत 52 लाख असल्याचे सांगण्यात आले.
6 / 8
यामी गौतमने याच वर्षी दिग्दर्शक आदित्य धरशी लग्न केले. यामीने लक्झरी ब्रँड Bvlgari चे मंगळसूत्र परिधान केले होते.यामी गौतमच्या मंगळसूत्राची किंमत 3 लाख 49 हजार असल्याचे सांगण्यात येत आहे.
7 / 8
शिल्पा शेट्टीने 2009 मध्ये राज कुंद्राशी लग्न केले. लग्नाच्या दिवशी ही अभिनेत्री अतिशय सुंदर वधू दिसत होती. शिल्पाच्या मंगळसूत्राने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. बातम्यांनुसार, अभिनेत्रीच्या मंगळसूत्राची किंमत 30 लाख रुपये होती.
8 / 8
शिल्पा शेट्टीने 2009 मध्ये राज कुंद्राशी लग्न केले. लग्नाच्या दिवशी ही अभिनेत्री अतिशय सुंदर वधू दिसत होती. शिल्पाच्या मंगळसूत्राने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. बातम्यांनुसार, अभिनेत्रीच्या मंगळसूत्राची किंमत 30 लाख रुपये होती.