कतरिना कैफ गेल्या काही दिवसांपासून तिच्या आगामी फोन भूत चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी कतरिना बिग बाॅसच्या मंचावर देखील आली होती.
फोन भूत या चित्रपटात कतरिना भूताच्या भूमिकेत आहे. नुकताच कतरिनाने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केली आहेत.
कतरिनाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा लूक एकदम खतरनाक दिसत आहे. फोटो शेअर करताना कतरिनाने सर्वांना हॅलोविनच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
फोटो आणि प्रमोशनचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यामध्ये कतरिनाचा चेहरा काही तरी वेगळाच दिसत असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे.
कतरिनाने शेअर केलेल्या फोटोंवर कमेंट करत चाहते विचार आहेत की, तुम्ही चेहऱ्याची सर्जरी केली का? काही चाहत्यांचे म्हणणे आहे की, अगोदरच कतरिना सुंदर दिसत होती.