फिरोज खान यांनी तब्बल 60 चित्रपटांमध्ये काम केले आहे. यामधील विशेष बाब म्हणजे काही चित्रपटांमध्ये नायक तर काही चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकाची देखील भूमिका केलीये. फिरोज खान यांचा जन्म 25 सप्टेंबर 1939 रोजी झाला होता.
फिरोज खान यांचे वडील मुळचे अफगाणिस्तानचे होते तर त्यांची आई इराणी होती. फिरोज खान यांनी बाॅलिवूडमध्ये स्वत: च्या मेहनतीवर नाव कमावले आहे. फिरोज खान यांनी बाॅलवूडमधील एक काळ गाजवलाय.
फिरोज खान यांना खरी ओळख ऊंचे लोग या चित्रपटामधून मिळालीये. चित्रपटांमध्ये काम करत असतानाच फिरोज खान यांना मुमताजवर प्रेम झाले. इतकेच नाही तर त्यांना लग्न देखील करायचे होते.
फिरोज खान आणि मुमताज यांचे लग्न होऊ शकले नाही. त्यानंतर फिरोज खानचा मुलगा फरदीन खानने मुमताजची मुलगी मताशा माधवानीसोबत लग्न केले.
असे म्हटले जाते की, सुंदरीसोबत लग्न झाल्यानंतर ज्योतिका नावाच्या एअरहोस्टेससोबत त्यांचे प्रेम प्रकरण सुरू झाले होते. त्यानंतर ते लिव्ह-इनमध्ये राहू लागले होते. इतकेच काय तर यामुळे सुंदरी आणि त्यांच्यामध्ये वाद देखील होत होते.