सुनिल शेट्टी याची मुलगी अथिया शेट्टी ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अथिया शेट्टी आणि क्रिकेटर के एल राहुल हे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते.
23 जानेवारीला हे दोघे लग्नबंधणात अडकणार असल्याची चर्चा आहे. इतकेच नाहीतर यांच्या लग्नाची तयारी देखील सुरू आहे. यांच्या लग्नाविषयी काही दिवसांपूर्वी स्वत: सुनिल शेट्टीने सांगितले होते.
असे सांगितले जाते की, अथिया आणि के एल राहुल यांची पहिली भेट कॉमन फ्रेंडमुळे झाली होती. नंतर यांची चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमामध्ये झाले. के एल राहुल याच्या अगोदर अथिया अमेरिकन रॅपरला डेट करत होती.
सुरूवातीला अथिया शेट्टी आणि के एल राहुल यांनी आपले रिलेशन सर्वांपासून लपून ठेवले होते. त्यानंतर यांचे काही फोटोही व्हायरल झाले. यादरम्यानच सुनिल शेट्टी यांनी के एल राहुल याचे काैतुक केले होते.
रिपोर्टनुसार अथिया शेट्टी आणि के एल राहुल यांचे लग्न तीन दिवस चालणार आहे. लग्नामध्ये जवळचे व्यक्ती उपस्थिती लावणार आहेत. विराट कोहलीसह अक्षय कुमार देखील या लग्नाला हजेरी लावणार असल्याचे सांगितले जात आहे.