डेटिंग अॅपवर आलिया आणि शेन ग्रेगोयरची पहिली भेट, जाणून घ्या कोण आहे अनुराग कश्यप यांचा होणारा जावई
अनुराग कश्यप यांची लेक आलिया हिने काही दिवसांपूर्वीच लिपलाॅक करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि साखरपुडा झाल्याचे जाहिर केले. आलिया हिचा होणारा पती हा एक व्यावसायिक आहे. अमेरिकेमध्ये त्याची कंपनी आहे. आलिया आणि शेन ग्रेगोयर यांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केले आहे.