Love Birds : कॉर्टनी कार्दशियन आणि ट्राविस बार्कर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार!
कॉर्टनी कार्दशियन आणि ट्राविस बार्कर यांना त्यांच्या नात्याला आणखी एक पाऊल पुढे टाकायचे आहे. कॉर्टनी मे महिन्यात लग्न करण्याचा प्लान करते आहे. कॉर्टनीला तिचे लग्न खूप गोपनीयतेने करायचे आहे, असे गेल्या अनेक दिवसांपासून बोलले जाते आहे. गेल्या वर्षी जानेवारीपासून त्यांच्या रिलेशनच्या बातम्या येत होत्या.