‘मेहंदी हे रचनेवाली…’, ‘कुंडली भाग्य’ फेम अभिनेत्री श्रद्धा आर्याच्या लग्नसोहळ्याची सुरुवात! पाहा फोटो..
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री श्रद्धा आर्या (Shraddha Arya) लग्नबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाली आहे. काल रात्री अभिनेत्रीचा मेहंदी सोहळा होता, ज्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
1 / 5
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री श्रद्धा आर्या (Shraddha Arya) लग्नबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाली आहे. काल रात्री अभिनेत्रीचा मेहंदी सोहळा होता, ज्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
2 / 5
श्रद्धाने मेहंदी सोहळ्यामध्ये जांभळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला होता, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. श्रद्धा आर्य आज म्हणजेच मंगळवारी (16 नोव्हेंबर) लग्नबंधनात अडकणार आहे. लग्नापूर्वी सोमवारी संध्याकाळी अभिनेत्रीचा मेहंदी सोहळा पार पडला, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
3 / 5
श्रद्धाच्या जवळच्या मैत्रिणींनीही या मेहंदी सोहळ्याला हजेरी लावली होती, ज्यामध्ये तिची को-स्टार आणि मैत्रिण अंजुमही दिसली होती. अंजुमनेही श्रद्धासाठी खास परफॉर्मन्स दिला.
4 / 5
अभिनेता शशांक व्यासही श्रद्धाच्या मेहंदी सोहळ्यात पोहोचला होता. ऑफ व्हाईट रंगाच्या कुर्ता पायजमामध्ये शशांक खूप डॅशिंग दिसत होता.
5 / 5
यापूर्वी, श्रद्धाने तिच्या भावी पतीचा फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये त्याने त्याच्या हातावर अभिनेत्रीच्या नावाची मेहंदी लावली होती.