Lara Dutta: टेनिसपटू महेश भूपतीशी असं जुळलं लाराचं सूत; पहिल्या पत्नीशी 7 वर्षांचा संसार मोडून केलं लग्न
माजी मिस युनिव्हर्स आणि बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ताचा (Lara Dutta) आज वाढदिवस आहे. लाराने आतापर्यंतच्या तिच्या करिअरमध्ये अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये गंभीर ते विनोदी अशा विविध भूमिका साकारल्या आहेत.
1 / 5
माजी मिस युनिव्हर्स आणि बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ताचा आज वाढदिवस आहे. लाराने आतापर्यंतच्या तिच्या करिअरमध्ये अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये गंभीर ते विनोदी अशा विविध भूमिका साकारल्या आहेत.
2 / 5
'पार्टनर', 'भागम भाग', 'बेल बॉटम', 'अंदाज' यांसारख्या चित्रपटांमध्ये लाराने आपली वेगळी छाप सोडली. 2000 मध्ये लाराने मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला होता.
3 / 5
चित्रपटांसोबतच लारा तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत होती. अभिनेता डिनो मोरियासोबत तिचं नाव जोडलं गेलं होतं. दोघांच्या रिलेशनशिपची खूप चर्चा होती. मात्र हे नातं फार काळ टिकू शकलं नाही.
4 / 5
डिनोशी ब्रेकअप झाल्यानंतर लाराच्या आयुष्यात महेश भूपतीची एण्ट्री झाली. महेशच्या क्रीडा कंपनीच्या व्यावसायिक बैठकीत या दोघांची पहिल्यांदा भेट झाल्याचं म्हटलं जातं. या भेटीत महेश भूपतीच्या साधेपणावर लारा भाळली होती.
5 / 5
महेशचं आधीच लग्न झालं होतं. महेशच्या घटस्फोटामागे लाराचा हात होता, असा आरोपही तिच्यावर लावण्यात आला होता. लग्नाच्या सात वर्षांनंतर महेशने पत्नीला घटस्फोट दिला. घटस्फोटानंतर महेशने अमेरिकेत कँडल लाइट डिनरदरम्यान लाराला प्रपोज केलं. 2011 मध्ये लाराने महेश भूपतीशी लग्न केलं.