Leander Paes Kim Sharma Affair | लिएंडर पेससोबतच्या नात्यावर शिक्कामोर्तब, अभिनेत्री किम शर्माने शेअर केला रोमँटिक फोटो
बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मा (Kim Sharma) आणि टेनिसपटू लिएंडर पेस (Leander Paes) यांच्या अफेअरच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. दोघेही अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसतात. तथापि, दोघांनी यापूर्वी कधीही त्यांच्या नात्याबद्दल कोणतीही अधिकृत पुष्टी दिली नव्हती.
1 / 6

2 / 6
पण आता किम शर्माची अलीकडील इन्स्टाग्राम पोस्ट तिच्या आणि लिएंडर पेसच्या नात्यावर शिक्कामोर्तब करत आहे. किम शर्मा आणि लिअँडर पेसने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यात किम पांढऱ्या ड्रेसमध्ये दिसत आहे, तर लिअँडर पेस ब्लू टीशर्ट आणि डेनिममध्ये दिसत आहे.
3 / 6
दोघेही या खास फोटोत हसताना दिसत आहेत. त्यांनी या फोटोच्या कॅप्शनमध्ये काहीही लिहिले नाही, परंतु एक मुलगा आणि मुलगी यांच्यातील प्रेम दर्शवणाऱ्या इमोजीचा वापर केला आहे.
4 / 6
किम आणि लिएंडरचे हे फोटो त्यांच्या डेटिंगच्या बातम्यांना हवा देत आहेत. मुंबईतही दोघांना एकाच वेळी पण वेग वेगळे स्पॉट केले गेले होते. किम आणि लिएंडर दोघेही फिरायला बाहेर गेले होते. तथापि, त्यांच्या फोटोंशिवाय त्यावेळी डेटिंगविषयी फारशी चर्चा झाली नव्हती.
5 / 6
लिएंडर पेसचे 2017मध्ये रिया पिल्लईशी लग्न झाले होते. पण काहीच काळात दोघेही वेगळे झाले. त्याचवेळी अभिनेता हर्षवर्धन राणे याच्यासमवेत किमच्या अफेअरची चर्चा झाली होती.
6 / 6
किम शर्मा हिला ‘मोहब्बतें’ या चित्रपटाद्वारे ओळख मिळाली. यानंतर त्यांनी ‘तुम से अच्छा कौन है’, ‘जिंदगी रॉक्स’, ‘मनी है तो हनी है’ अशा चित्रपटांमध्ये काम केले, परंतु तिला हवे तितके यश मिळू शकले नाही.