काली पोस्टर वादामध्ये लीना मनिमेकलाई हिने सर्वोच्च न्यायालयात घेतली धाव
चित्रपट निर्माती लीना मनिमेकलाई हिने सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केलीये. 'काली' च्या पोस्टरनंतर मोठा वाद सुरू झाला होता. याचप्रकरणात आता ही याचिका दाखल करण्यात आलीये.
1 / 5
चित्रपट निर्माती लीना मनिमेकलाई हिने सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केलीये. 'काली' च्या पोस्टरनंतर मोठा वाद सुरू झाला होता. इतकेच नाहीतर देशामध्ये अनेक ठिकाणी लीना मनिमेकलाई हिच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्या.
2 / 5
आता याचप्रकरणात लीना मनिमेकलाई हिने तिच्यावर दाखल असलेल्या अनेक प्रकरणांमध्ये संरक्षण मागितले आहे. 'काली' या डॉक्यूमेंट्रीमध्ये लीनाने देवी काली सिगारेट ओढताना दाखवले होते.
3 / 5
याच वादातून लीना हिच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले. आता लीना हिने सर्वोच्च न्यायालयाकडे या सर्व एफआयआर एकत्र करून त्या रद्द करण्याची मागणी केली आहे.
4 / 5
आता यासर्व प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी 20 जानेवारी रोजी ठेवली आहे. आता या सुनावणीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
5 / 5
कालीच्या पोस्टरनंतर लीना हिला जीवे मारण्याच्या धमक्या आणि शिरच्छेदन करण्याचे फोन सातत्याने येत होते. यानंतर लीना हिने याबद्दल स्पष्टीकरण देखील दिले होते.