अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) कायम वेग-वेगळ्या लूकमध्ये फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. पण साडीमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य अधिक फुलून दिसतं.
अनेक कार्यक्रमात किंवा फोटोशूटसाठी माधुरी साडी नेसते आणि फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सध्या अभिनेत्रीचे साडीतील काही फोटो तुफान व्हायरल होत आहे.
अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात घर केलं. आजही माधुरीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अभिनेत्रीला फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
माधुरी म्हणजे बॉलिवूडची 'धक धक गर्ल...' वयाच्या ५५ व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. आजही माधुरी तितकीच सुंदर दिसते.
सध्या सर्वत्र माधुरी हिच्या फोटोंची चर्चा रंगत आहे. सोशल मीडियावर माधुरीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. माधुरी फक्त अभिनेत्री नसून प्रसिद्ध कथक नृत्यांगना देखील आहे.