PHOTO | कोरोनाकाळात हास्यथेरपी, महाराष्ट्राची हास्यजत्राच्या कलाकारांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते सन्मान!
कोरोनामुळे सध्या आजूबाजूला चिंतेचं आणि नैराश्याचं वातावरण पसरलं आहे. आजार, चिंता आणि एकंदरीत भीतीमुळे लोक हसणं विसरून जातात. अशा रुग्णांना मनोरंजनाचे क्षण मिळावेत आणि त्यांनी दिलखुलास हसावं यासाठी सोनी मराठी वहिनीचा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
1 / 7
कोरोनामुळे सध्या आजूबाजूला चिंतेचं आणि नैराश्याचं वातावरण पसरलं आहे. आजार, चिंता आणि एकंदरीत भीतीमुळे लोक हसणं विसरून जातात.
2 / 7
अशा रुग्णांना मनोरंजनाचे क्षण मिळावेत आणि त्यांनी दिलखुलास हसावं यासाठी सोनी मराठी वहिनीचा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. याकाळात संपूर्ण महाराष्ट्रातील कोव्हिड सेंटर्समध्ये सोनी मराठी वाहिनीने टीव्ही उपलब्ध करून दिली होते.
3 / 7
क्वारंटाईनच्या काळात हास्यजत्रा पाहून अनेकांना दिलासा मिळाला आणि त्यांचं मानसिक स्वास्थ्य सुधारलं, अशा आशयाचे मेसेज आणि इमेल्स टीमला कौतुकरुपी मिळाले होते.
4 / 7
नुकतेच या कार्यक्रमातील कलाकारांच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
5 / 7
कोरोना काळात रसिकांना हास्यथेरपी देण्याची काम हास्यजत्रेच्या कुटुंबाने प्रामाणिकपणे केले.
6 / 7
ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतील "माझा पुरस्कार" हास्य जत्रा मालिकेतील कलाकारांना माननीय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी देण्यात आला.
7 / 7
यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि आदेश बांदेकर देखील उपस्थित होते. प्रतिष्ठेचा हा पुरस्कार कलेची जाण असलेल्या व्यक्तीकडून स्वीकारावा यापेक्षा अजून काय हवं?, अशी प्रतिक्रिया काल्कारणी व्यक्त केल्या आहेत.