Mahesh Bhatt | ‘माझ्या जवळ येवू नको, तुला उद्ध्वस्त करेल…’, असं कोणाला म्हणाले महेश भट्ट?
मुंबई : 20 सप्टेंबर 2023 | दिग्दर्शक आणि निर्माते महेश भट्ट यांनी अनेक सिनेमांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं आहे. त्यांचे अनेक सिनेमे हीट झाले तर काही सिनेमांना अपयश मिळालं. पण महेश भट्ट फक्त त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयु्ष्यामुळे देखील चर्चेत असतात.
1 / 5
महेश भट्ट यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यात अनेक चढ - उतार आले. पण जेव्हा महेश भट्ट यांना पत्नी सोनी राजदान यांची साथ मिळाली. तेव्हा त्यांनी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. एका मुलाखतीत खुद्द महेश भट्ट यांनी सोनी राजदान यांच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल सांगितलं.
2 / 5
महेश पत्नी सोनी यांना म्हणाल्या होत्या, 'मझ्या इतक्या जवळ येवू नको मी तुला उद्ध्वस्त करेल...' यावर सोनी म्हणाल्या, 'मी उद्ध्वस्त होण्यासाठी तयार आहे...' महेश भट्ट यांचं सोनी राजदान यांच्यासोबत दुसरं लग्न आहे. सध्या सर्वत्र महेश भट्ट यांची चर्चा सुरु आहे.
3 / 5
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, खासगी आयुष्यातील संबंधीत गोष्ट महेश भट्ट यांनी सिनेमांमध्ये देखील वापर केला. सोनी राजदान आणि महेश भट्ट यांना दोन मुली आहेत. शाहीन आणि आलिया भट्ट अशी त्यांच्या मुलींची नावे आहेत.
4 / 5
'सडक' पासून 'आशिकी'पर्यंत आणि 'जिस्म २' पासून 'जख्य' सिनेमांना फक्त आणि फक्त महेश भट्ट यांच्यामुळे यश मिळालं. महेश भट्ट आज स्वतःच ७४ वाढदिवस साजरा करत आहेत म्हणून त्यांच्याबद्दल अनेक गोष्ट समोर येत आहेत.
5 / 5
करियरच्या सुरुवातीपासून दिग्दर्शक आणि निर्माते महेश भट्ट यांचं आयुष्य चर्चेत राहिलं. खासगी आयुष्यामुळे महेश भट्ट अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले. आज महेश भट्ट यांचा वाढदिवस असल्यामुळे दिग्दर्शक चर्चत आले आहेत.