आज बॉलिवूडचे ज्येष्ठ चित्रपट निर्माते महेश भट्ट आपला 73 वा वाढदिवस साजरा करत आहेत.
अशात आलिया भट्टनं वाढदिवस साजरा करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. महेश यांची पत्नी सोनी राजदाननेही केकचा फोटो शेअर करून आपल्या पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आलिया भट्ट सोबत तिचा बॉयफ्रेंड आणि बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर देखील या फोटोंमध्ये दिसतो आहे.
फोटोमध्ये महेश भट्ट त्यांच्या दोन मुली पूजा आणि आलिया तसेच रणबीरसोबत पोज देताना दिसत आहेत. रणबीर कपूर फोटो क्लिक करताना दिसतो आहे. हे फोटो पाहून दोन्ही स्टार्सचे चाहते खूप आनंदी होत आहेत.
त्याचवेळी फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की महेश भट्ट यांनी काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि डेनिम परिधान केला आहे. आलिया भट्ट त्यांच्या मागे एक फुगा घेऊन बसली आहे आणि ती धमाल करताना दिसत आहे.
रणबीरने ज्या प्रकारे मध्यरात्री आलियाच्या वडिलांचा वाढदिवस साजरा केला. त्यामुळे हे स्पष्ट झालं आहे की दोघंही आता नात्यावर शिक्कामोर्तब करण्यास तयार आहेत.