Myra Vaikul | ‘मी हाय कोली….’, चिमुकल्या मायराच्या क्युट फोटोशूटवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव!
‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत श्रेयस आणि प्रार्थना सोबत झळकणारी चिमुकली मायरा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. मालिका सुरु होण्याआधीपासून मायरा प्रेक्षकांची लाडकी बनली होती. प्रार्थना आणि श्रेयससोबतच आता चिमुकली मायरा देखील प्रेक्षकांना भुरळ घालत आहे.
1 / 5
‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत श्रेयस आणि प्रार्थना सोबत झळकणारी चिमुकली मायरा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. मालिका सुरु होण्याआधीपासून मायरा प्रेक्षकांची लाडकी बनली होती. प्रार्थना आणि श्रेयससोबतच आता चिमुकली मायरा देखील प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे या दोन बड्या कलाकारांच्या छोट्या पडद्यावरील पुनरागमनाच्या चर्चेपेक्षाही क्युट मायरा भाव खाऊन जात आहे.
2 / 5
मायरा वायकुळने टिकटॉक व्हिडीओजच्या माध्यमातून प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. टिकटॉक स्टार म्हणून तिची ओळख होती. सध्या इन्स्टाग्रामवरही तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. सध्या तिचे 75 हजारांपेक्षा जास्त (75.3k) चाहते आहेत.
3 / 5
नुकतेच मायराने एक क्यूट फोटोशूट केले आहे. यात ती पारंपारिक कोलीवेशात दिसत आहे. मायराचा हा क्युट लूक पाहून चाहते देखील तिचे तोंडभरून कौतुक करत आहेत.
4 / 5
युट्यूबवर Myra’s corner हे मायराचे चॅनल आहे. त्यावर तिचे आतापर्यंत 105K म्हणजे एक लाख पाच हजाराहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. या चॅनलवर मायराचे अनेक व्हिडीओ तुम्हाला पाहायला मिळतील. मायराच्या योगा सेशन, खेळण्यांपासून तिने बनवलेला केक आणि हळदी कुंकू समारंभापर्यंत अनेक व्हिडीओ दिसतात.
5 / 5
मायरा वायकुळ आपल्या कुटुंबासोबत मुंबईत राहते. तिची आई तिचे सोशल मीडिया अकाऊण्ट सांभाळते. फक्त मायराच नाही, तर तिची आई श्वेता वायकुळचेही हजारो फॉलोअर्स इन्स्टाग्रामवर आहेत.