Malaika Arora : ‘पाठ फिरवल्यानंतर विश्वास…’, अर्जुनच्या वाढदिवशी मलायकाची क्रिप्टिक पोस्ट
अभिनेता अर्जुन कपूर याचा आज वाढदिवस आहे. वाढदिवस असल्यामुळे अभिनेत्याला फक्त सेलिब्रिटी नाही तर, चाहते देखील शुभेच्छा देत आहे. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अर्जुन याला शुभेच्छा दिल्या. पण अभिनेत्री मलायका अरोरा हिने सोशल मीडियावर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.
1 / 5
अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांच्या नात्याबद्दल प्रत्येकाला माहिती आहे. एकेकाळी कपल गोल्स देणाऱ्या अर्जुन - मलायका यांच्या ब्रेकअपची चर्चा रंगली आहे.
2 / 5
गेल्या 5 वर्षांपासून एकत्र वाढदिवस साजरा करणारे मलायका - अर्जुन आता विभक्त झाल्याची माहिती मिळत आहे. शिवाय अर्जुन याच्या वाढदिवशी अभिनेत्रीने क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.
3 / 5
इन्स्टाग्राम स्टोरीवर अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर केली आहे. 'डोळे बंद केल्यानंतर आणि पाठ फिरवल्यानंतर विश्वास ठेऊ शकतो... अशीच लोकं मला आवडतात...' असं अभिनेत्रीचं स्टेटस आहे.
4 / 5
सांगायचं झालं तर, बुधवारी वाढदिवस असल्यामुळे मंगळवारी अभिनेत्याच्या घरी पार्टी ठेवण्यात आली होती. वांद्रे येथील राहात्या घरी अर्जुन कपूर याच्या वाढदिवसाच्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मलायका गायब होती.
5 / 5
2019 मध्ये मलायका - अर्जुन यांनी सर्वांसमोर नात्याची घोषणा केली. आता 5 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अर्जुन - मलायका यांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.