बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदीचे (Mandira Bedi) पती दिग्दर्शक राज कौशल (Raj Kaushal) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. राज कौशल यांच्या निधनाच्या बातमीमुळे संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले.
मंदिरा बेदी आणि पती राज कौशल यांचा प्रेमविवाह होता. पती राज कौशल असे अचानकपणे सोडून गेल्यामुळे मंदिरा बेदीवर दु:खाचा डोंगर कोसळला. राज यांच्या अत्यंविधीवेळी मंदिरा बेदी आक्रोश करत होती.
पतीचा मृतदेह समोर पाहून मंदिरा बेदीला अश्रू अनावर झाले. राज कौशल यांना पाहताच मंदिरा ओक्साबोक्सी रडू लागली.
राज कौशल यांच्या जाण्याने मंदिरा बेदीला धक्का बसला असून मंदिराचे सर्व कुटुंबीय शोकाकूल झाले आहेत.
रविवारी मंदिरा बेदी तसेच राज कौशल यांनी आपल्या मित्रांसोबत पार्टी केली. यावेळी राज कौशल यांची प्रकृती ठणठणीत होती.
या पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या पार्टीमध्ये क्रिकेटपटू झहीर खान, सागरिका घाटगे, नेहा धुपीया अदी उपस्थित होते.
राज कौशल हे उत्तम दिग्दर्शक होते. त्यांच्या अशा अचानकपणे जाण्यामुळे बॉलिवडूमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.