Gayatri Datar : निळा ड्रेस आणि दिलखेचक अदा, पाहा गायत्री दातारचा हटके लूक
गायत्रीचे नवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. तिनं आता निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर फोटोशूट केलं आहे. (Marathi Actress Gayatri Datar's amazing look, See Pictures)
1 / 5
बहुचर्चित ‘बिग बॉस मराठी’चं (Bigg Boss Marathi 3) तिसरं पर्व सुरू झालं आहे. अशात प्रेक्षकांचे लाडके कलाकार अतिशय उत्तम प्रकारे खेळ खेळत आहेत. अभिनेत्री गायत्री दातारही या पर्वात भाव खाऊन जात आहे.
2 / 5
नुकतंच गायत्रीचे नवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. तिनं आता निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर फोटोशूट केलं आहे.
3 / 5
आता गायत्रीचा नवा लूक प्रेक्षकांच्या समोर आला आहे. तिनं बिग बॉसच्या घरात एंट्री करण्यापूर्वी मेकओव्हर केला आहे.
4 / 5
तिचे हे फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत. मराठी मालिकांमधील सुप्रसिद्ध चेहरा अर्थात अभिनेत्री गायत्री दातार सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे.
5 / 5
'तुला पाहते रे' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली महाराष्ट्राची लाडकी ईशा म्हणजेच अभिनेत्री गायत्री दातार रसिकांच्या मनावर राज्य करतेय. 'तुला पाहते रे' या मालिकेतून गायत्रीनं टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिला खास ओळख मिळाली. आता सध्या गायत्री बिग बॉसच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे.