Prajakta Mali : बदन पे सितारे लपेटे हुये…, अभिनेत्री प्राजक्ता माळीचे हे फोटो पाहिलेत?
नेहमीच सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करणारी अभिनेत्री प्राजक्ता माळीनं पुन्हा एकदा आपल्या फोटोंनी चाहत्यांना वेड लावलं आहे.
(Marathi Actress Prajakta Mali's new photoshoot, See pictures)
1 / 5
प्राजक्ताचे नाव काढताच समोर येतात ती मंद सुगंधाची, मन प्रफुल्लित करणारी मोहक फुले. जुलै महिन्यात ही फुले बहरून येतात आणि त्याचा सुगंध सर्वत्र दरवळू लागतो. अशाच प्राजक्तला साजेसे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्राजक्ता माळी (Prajakta Mali). अभिनेत्री, नृत्यांगना, सूत्रसंचालक अशा विविध माध्यमांमधून तिने कायमच तिच्या कलाकृतीचा सुगंध सर्वत्र दरवळवला.
2 / 5
नेहमीच सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करणारी अभिनेत्री प्राजक्ता माळीनं पुन्हा एकदा आपल्या फोटोंनी चाहत्यांना वेड लावलं आहे. नवनवीन फोटो शेअर करणाऱ्या प्राजक्तानं आता साडीतील काही फोटो शेअर केले आहेत.
3 / 5
महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या पोजमध्ये तिनं हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय, शिवाय तिच्या चाहत्यांनाही हे फोटो प्रचंड पसंतीस उतरले आहेत.
4 / 5
प्राजक्ता माळी मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री असून ती कसदार अभिनयासाठी ओळखली जाते. महाराष्ट्रात तिचे लाखे चाहते आहेत.
5 / 5
प्राजक्ता माळी या अभिनेत्रीने आणि काशिनाथ घाणेकर, खो-खो, गोळाबेरीज, संघर्ष अशा चित्रपाटांतून कसदार अभिनय करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सोबतच काही दिवसांपुर्वीच प्राजक्तानं स्वत:चा एक कविता संग्रह प्रकाशित केला आहे. त्यामुळे आता तिच्या ओळखीत आणखी एक कमालीच्या गोष्टीची भर पडली आहे.