अभिनेत्री सई लोकुर आपल्या इन्स्टाग्रामवर नेहमी फोटो शेअर करत असते. सईने नुकतंच तिचा पती तीर्थदीप रॉय सोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोला तिने "टेढा है पर मेरा है...", असं कॅप्शन दिलं आहे.
या फोटोत तीर्थदीपने निळ्या रंगाचा शर्ट घातला आहे. तर तर सईने निळ्या आणि लाल रंगाचा ड्रेस घातलाय.
काही दिवसांआधी सई आणि तीर्थदीप कान्हा नॅशनल पार्कमध्ये फिरायला गेले होते. तेव्हाही सईने सोशल मीडियावर फोटो शेअर केले होते.
सई आणि तीर्थदीप यांनी 2020 लग्न केलं. सई आपल्या इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह असते. ती नेहमी वेगवेगळे फोटो शेअर करते. सूर्यास्ता वेळी काढलेला हा फोटोही तिने शेअर केला होता.