आपल्या विनोदी व्यक्तीमत्वानं प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री श्रेया बुगडे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
आता श्रेयानं ग्लॅमरस अंदाजात काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
जयपूर नामा ...... Tales from the pink city ….? असे कॅप्शन देऊन तिने फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये हत्ती सफारीपासून हवा महलपर्यत सर्वाचा समावेश आहे.
श्रेयाने तिच्या परिवारासोबत नुकतीच पिंक सिटी जयपूर येथे गेली होती. या ट्रिपचे फोटो तिने सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये तिने हॅन्डलूमचा सफेद ड्रेस परिधान करुन हत्ती सफारीपासून करताना दिसत आहे.
या सफरी सोबतच तिने तिच्या जयपूर सहलीचे फोटो शेअर केले आहेत.
जयपूरमध्ये मिळणारी खास कुल्फीची मजा घेताना ती दिसत आहे.
जयपूरमध्ये व्यतीत केलेल्या निसर्गाच्या सानिध्यातील फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोवरती चाहत्यांनी लाईकचा पाउस केला आहे.
कामाच्या व्यापामधून वेळ काढत श्रेया तिच्या परिवारासोबत जयपूरमध्ये सुंदर वेळ घालवताना दिसत आहे.