अभिनेत्री मौनी रॉयने लग्नानंतर पहिल्यांदा करवा चौथचे व्रत ठेवले होते. या स्पेशल दिवसाचे काही फोटो मौनीने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
करवा चौथनिमित्त मौनी रॉयचा सुंदर लूक बघायला मिळाला. मौनीने सुंदर साडी आणि चूडा घातलेला फोटोंमध्ये दिसत आहेत.
व्रत सोडल्यानंतर मौनीने पती सूरजसोबत रोमँटिक फोटो काढले. इतकेच नाही तर सूरजने प्रेमाने मौनीला किस देखील केले.
मौनी आणि सूरजने 2022 मध्ये लग्न केले असून सूरज हा दुबईतील सुप्रसिद्ध उद्योगपती आहे. मौनीच्या लग्नातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.
करवा चौथनिमित्ताने मौनी रॉयने सोनेरी रंगाची साडी घातली होती. मौनीचे हे करवा चौथचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.