Gautami Patil : ‘दादा गौतमी पाटील आली’, ‘जय श्रीराम, लव यू मुंबईकर’ PHOTOS
Gautami Patil : आज दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने मुंबईकरांना गौतमी पाटीलच्या नृत्याचा आनंद घेता आला आहे. बोरीवली मागाठाणे येथे गौतमी पाटीलने तिच्या नृत्याचा जलवा दाखवला.
-
-
प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील आज मुंबईत आलीय. तिने उपस्थित गर्दीसमोर धमाकेदार परफॉर्मन्स केला. गौतमी पाटीलचे संपूर्ण महाराष्ट्रात चाहते आहेत.
-
-
दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने गौतमी पाटील आज मागाठाणे येथे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मतदारसंघात आली होती. प्रकाश सुर्वे दरवर्षी भव्य स्वरुपात दहीहंडी उत्सवाच आयोजन करतात.
-
-
गौतमी पाटील टीव्ही 9 मराठीशी बोलली. यावेळी ती म्हणाली की, ‘मी ऑल महाराष्ट्र शो करत असते. मुंबईची गोष्टच वेगळी आहे. लव यू मुंबईकर’
-
-
“मी मागाठाणे येथे दहीहंडी उत्सवाला येण्याच हे दुसरं वर्ष आहे. मी प्रकाश सुर्वे यांचे आभार मानते. त्यांनी मला पुन्हा संधी दिली. अजून डान्स करायचा आहे. अजिबात हरायच नाय, लढायचं लव यू” असं गौतमी पाटील.
-