Mumbai Diaries 26/11 teaser : मोहित रैनाच्या सीरीजचा टीझर रिलीज, या दिवशी होणार प्रीमियर
मुंबई डायरीज 26/11 हे एक वैद्यकीय क्षेत्रावर आधारित काल्पनिक सीरीज आहे जी संपूर्ण शहराला एकत्र आणते. ही सीरीज सरकारी रुग्णालयाच्या आपत्कालीन कक्षात (Mumbai Diaries 26/11 teaser: Mohit Raina series teaser release, premiere on this day)
1 / 5
मोहित रैनाची वेब सीरीज मुंबई डायरीज 26/11 ची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. या सीरीजमध्ये मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यात लोकांना वाचवण्यात डॉक्टर, परिचारकांनी कशी महत्त्वाची भूमिका बजावली हे सांगण्यात येणार आहे. आता या सीरीजचा टीझर रिलीज झाला आहे.
2 / 5
आता कोरोना काळात आपण डॉक्टर आणि वैद्यकीय योद्ध्यांना दिवस -रात्र निस्वार्थपणे लोकांचा जीव वाचवण्यासाठी काम करताना पाहिले आहे.
3 / 5
शौर्य दाखवलेल्या अशा वीरांची कहाणी सांगणारी मुंबई डायरी 26/11 ही काल्पनिक सीरीज आहे जी निखिल आडवाणीनं लिहीली आहे आणि मोनीषा अडवाणी आणि एम्मी एंटरटेनमेंटच्या मधु भोजवानी यांनी निर्मित केले आहे.
4 / 5
याचं दिग्दर्शन निखिल अडवाणी आणि निखिल गोन्साल्विस यांच्यासह केलं आहे. मुंबई डायरी 26/11 मध्ये 26 नोव्हेंबर 2008 रोजी शहराला उद्ध्वस्त केलेल्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान जीव वाचवण्यासाठी डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिक्स आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची अनकथित कथा दाखवण्यात आली आहे.
5 / 5
मुंबई डायरीज 26/11 हे एक वैद्यकीय क्षेत्रावर आधारित काल्पनिक सीरीज आहे जे संपूर्ण शहराला एकत्र आणते. ही सीरीज सरकारी रुग्णालयाच्या आपत्कालीन कक्षात उद्भवणाऱ्या घटनांचा लेखाजोखा आहे, जेव्हा रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी आव्हानांचा आणि संकटाला सामोरे गेले तेव्हा नेमकं काय घडलं हे या चित्रपटातून पाहायला मिळणार.