Mumbai NCB Raid: क्रूझवर पार्टीसाठी मी पाहुणा म्हणून गेलो होतो, चौकशीवेळी शाहरुखचा लेक आर्यनचे 3 मोठे दावे!
अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) शनिवारी रात्री रेव्ह पार्टीवर केलेल्या कारवाईत बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशीदरम्यान आर्यनने एनसीबीच्या अधिकाऱ्यांसमोर तीन दावे केले. त्यातील पहिला दावा म्हणजे क्रूझवरील पार्टीसाठी मला पाहुणा म्हणून बोलावलं होतं, असं आर्यनने सांगितलं.