Jhund: नागराज मंजुळेंची मराठीमोळी ‘झुंड’; फँड्री-सैराटमधल्या ‘या’ कलाकारांना पाहता येणार
नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असा 'झुंड' (Jhund) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात नागराज मंजुळे यांच्या 'फँड्री' आणि 'सैराट' चित्रपटातील बरेच कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.
1 / 10
नागराज मंजुळे दिग्दर्शित बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असा 'झुंड' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात नागराज मंजुळे यांच्या 'फँड्री' आणि 'सैराट' चित्रपटातील बरेच कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.
2 / 10
'सैराट'मध्ये आर्चीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू 'झुंड'मध्ये मोनिकाच्या भूमिकेत आहे.
3 / 10
मोनिकाच्या भूमिकेतील रिंकूचा हा लूक आहे.
4 / 10
'सैराट'मध्ये परश्याची भूमिका साकारलेला अभिनेता आकाश ठोसर हा 'झुंड'मध्ये संभ्याच्या भूमिकेत आहे.
5 / 10
रिंकू आणि आकाशचा 'झुंड'मधील लूक
6 / 10
'फँड्री'मध्ये जब्याची भूमिका साकारलेला सोमनाथ अवघडे आठवतोय का? तोसुद्धा झुंड या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.
7 / 10
हलगी वाजवणारा हा जब्या आता अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेल्या झुंड या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.
8 / 10
'सैराट' या चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. अजय-अतुल या लोकप्रिय जोडगोळीने सैराटमधील गाणी संगीतबद्ध केली होती. 'झुंड'साठीही नागराज मंजुळेंनी अजय-अतुललाच पसंती दिली आहे.
9 / 10
याशिवाय बरेच मराठी कलाकारसुद्धा या चित्रपटात पहायला मिळत आहेत. छाया कदम यांचीसुद्धा चित्रपटात भूमिका आहे.
10 / 10
अभिनेते किशोर कदम यांनीसुद्धा 'झुंड'मध्ये भूमिका साकारली आहे.