भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाच्या चाहत्यांची यादी खूप मोठी आहे. मोनालिसा नेहमीच तिच्या चाहत्यांमध्ये सौंदर्याची जादू दाखवत असते.
नुकतंच मोनालिसानं पुन्हा एकदा इन्स्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्रीची स्टाईल सुंदर आहे.
मोनालिसानं शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती डेनिम स्टाईलच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे. यासोबतच मोनालिसाने सुंदर हेअरस्टाईल केली आहे.
कोट्यावधी हृदयावर राज्य करणारी मोनालिसा प्रत्येक फोटोमध्ये वेगळ्या स्टाईलमध्ये पोज करताना दिसत आहे.
सध्या मोनालिसा कलर्सवरील शो नमक इश्क का मध्ये नकारात्मक भूमिकेत दिसते आहे. या भूमिकेबद्दल मोनालिसाचं खूप कौतुक होत आहे.