प्रसिद्ध अभिनेत्री निक्की तांबोळी तिच्या बोल्ड स्टाइलमुळे कायमच चर्चेत असते. निक्की कायमच वादाच्या भोवऱ्यात देखील सापडते.
सुकेश चंद्रशेखर प्रकरणात निक्कीचे नाव आल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. इतकेच नाही तर निक्की जेलमध्ये देखील सुकेशला भेटण्यासाठी गेली होती.
निक्की तांबोळी हिला 'बिग बॉस 14' मध्ये खरी ओळख मिळाली. बिग बाॅसनंतर निक्कीच्या फॅन फाॅलोइंगमध्येही मोठी वाढ झाली.
नुकताच निक्कीने बोल्ड लूकमध्ये फोटोशूट केले आहे. अमित खन्नाने हे शूट केले असून हे फोटो आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
गाउनमध्ये निक्कीने हे फोटोशूट केले आहे. निक्कीच्या चाहत्यांना देखील तिचे हे फोटोशूट आवडले आहे. जान कुमार सानू आणि निक्की खूप चांगले मित्र आहेत.