Nirupa Roy Birth Anniversary | ‘बॉलिवूडची आई’, खऱ्या आयुष्यातही लोक निरुपा रॉय यांना मानू लागले देवी!

| Updated on: Jan 04, 2022 | 8:45 AM

'मदर ऑफ बॉलिवूड' म्हटलं की जर कोणत्याही अभिनेत्रीचे नाव आपल्या डोळ्यासमोर येत असेल, तर ते म्हणजे अभिनेत्री निरुपा रॉय. 4 जानेवारी रोजी जन्मलेल्या निरुपा रॉय यांनी सुरुवातीच्या काळात ग्लॅमरस भूमिका केल्या. मात्र, त्यांनी साकारलेले आईचे पात्र लोकांच्या हृदयात इतके रुजले की, त्यांना थेट 'मदर ऑफ बॉलिवूड' अशी पदवीच देण्यात आली.

1 / 5

2 / 5
निरुपा रॉय यांचा जन्म गुजरातमध्ये झाला. वयाच्या 15व्या वर्षी कमल रॉयसोबत त्यांचा विवाह झाला होता. लग्नानंतर निरुपा रॉय मुंबईत आल्या. त्यांना योगेश आणि किरण अशी दोन मुले होती. निरुपा रॉय यांचे खरे नाव कोकिला किशोरचंद्र बुलसारा आहे. चित्रपटसृष्टीत आल्यानंतर निरुपा रॉय यांनी आपले नाव बदलले.

3 / 5
निरुपा रॉय यांना आईच्या भूमिकेत सर्वांनीच पाहिले आहे. परंतु, त्यांनी 16 चित्रपटांमध्ये देवीची भूमिका साकारल्याचे फार कमी लोकांना माहिती आहे. देवीच्या पात्रात निरुपा रॉय यांनी अशी छाप सोडली की, लोक त्यांना खरोखरच देवी मानू लागले. एवढेच नाही तर लोक त्यांच्या घरी जाऊन, त्यांचे चरणस्पर्श करून भजन गात असत.

4 / 5
निरुपा रॉय यांना 50च्या दशकातील धार्मिक चित्रपटांची राणी मानले जात असे. त्यांनी अभिनेता त्रिलोक कपूरसोबत डझनभर धार्मिक चित्रपट केले. याशिवाय त्या अनेक चित्रपटांमध्ये मुख्य ग्लॅमरस भूमिकेतही दिसल्या. 50च्या दशकात निरुपा रॉय यांना 'देवी' मानले जात होते, तर निरुपा रॉय यांनी 70 आणि 80च्या दशकात इतक्या चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारली की, 'आई'  ही त्यांची ओळखच बनली.

5 / 5
निरुपा रॉय यांनी अमिताभ बच्चन ते शशी कपूर, जितेंद्र यांसारख्या अभिनेत्यांच्या आईची भूमिका साकारली होती. 1999 मध्ये आलेल्या 'लाल बादशाह' चित्रपटात अमिताभ बच्चन आणि निरुपा रॉय हे दोघेही आई-मुलाच्या भूमिकेत शेवटचे दिसले होते. निरुपा रॉय यांनी त्यांच्या 5 दशकांच्या दीर्घ बॉलिवूड करिअरमध्ये जवळपास 300 चित्रपटांमध्ये काम केले.