बॉलिवूड अभिनेत्री मोरा फतेही सध्या प्रचंड चर्चेत आहे. सुकेश चंद्रशेखर प्रकरणी नोराचेही नाव पुढे आलंय. नोरालाही सुकेशने महागडे गिफ्ट दिले आहेत.
नोरालाही सुकेश चंद्रशेखर प्रकरणी चाैकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, हे सर्व टेन्शन आयुष्यामध्ये सुरू असताना देखील नोरा सोशल मीडियावर सक्रिय आहे.
नुकताच नोराने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही खास फोटो शेअर केले आहेत. अलिकडेच नोराने हे फोटोशूट केल्याची माहिती मिळत आहे.
वाईन कलरच्या गाऊनमध्ये तिने हे फोटोशूट केले असून तिचे हे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत. नोराचे हे फोटो आता सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.
या फोटोशूटमध्ये नोराने परफेक्ट पार्टी मेकअप लूक केल्याचे दिसत आहे. नोराच्या या फोटोंवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट देखील करत आहेत.